शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

‘स्वच्छता अ‍ॅप’मध्ये तक्रार द्या, कोल्हापूर शहर स्वच्छ ठेवुया, जागृतीसाठी महापालिका प्रशासनाची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 01:37 IST

कोल्हापूर : स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अंतर्गत 'स्वच्छता अ‍ॅप' डाऊनलोड करण्यात कोल्हापूर शहर देशातील अन्य शहरांच्या तुलनेने अत्यंत मागे असून, देशात आजच्या स्थितीला 192 व्या स्थानावर आहे.

ठळक मुद्देदेशात अन्य शहरांमध्ये सांगली १०९, सातारा ७५, रत्नागिरी ३०१, सोलापूर १३२ स्थानावर आहेत.स्वच्छता गुणवत्तेविषयक विविध निकष सहभागी शहरांना पार पाडायचे आहेत. थेट प्रशासनाशी घरबसल्या समन्वय साधता यावा हा या ‘स्वच्छता अ‍ॅप’चा मुख्य उद्देश आहे.

शेखर धोंगडे ।कोल्हापूर : स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अंतर्गत 'स्वच्छता अ‍ॅप' डाऊनलोड करण्यात कोल्हापूर शहर देशातील अन्य शहरांच्या तुलनेने अत्यंत मागे असून, देशात आजच्या स्थितीला 192 व्या स्थानावर आहे. आज स्थितीला संपूर्ण शहरातून केवळ एक हजार १७० नागरिकांनी हे स्वच्छता अ‍ॅप डाऊन लोड केले असून, यावर १३६ तक्रारी दाखल झाल्या आहेत.

हे अ‍ॅप अधिकाधिक नागरिक, युवकांनी डाऊनलोड करून त्यावर तक्रारी देऊन शहर स्वच्छतेसाठी पुढाकार घ्यावा यासाठी अधिकारी, कर्मचारी यांचे जनजागृतीसाठी प्रयत्न सुरू आहेत.२ आॅक्टोबर २०१४ ला महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता मोहिमेअंतर्गत स्वच्छ सर्वेक्षणाची सुरुवात केली. या मोहिमेत केवळ सरकारी कमचाºयांवर भर न देता समाजाच्या सर्वच स्तरांतील नागरिकांनी भर द्यावा, म्हणून जनजागृती करण्यात आली.

नागरिकांनी केलेल्या तक्रारी, सूचना यांची तातडीने दखल घेऊन त्या सुधारल्या पाहिजेत. स्वच्छता अभियानाबरोबरच अन्य सुविधा नागरिकांना मागणीनुसार मिळाल्या पाहिजेत, तसेच थेट प्रशासनाशी घरबसल्या समन्वय साधता यावा हा या ‘स्वच्छता अ‍ॅप’चा मुख्य उद्देश आहे.परंतु, कोल्हापूर शहरातील जनतेकडून याला आवश्यक असा प्रतिसाद मिळत नसल्याने अन्य शहरांच्या तुलनेत आपले शहर मागेच आहे. यामुळे प्रशासकीय यंत्रणेपुढे जनजागृतीचे आव्हान असून, प्रशासनाने आता नागरिकांनीही हे अ‍ॅप डाऊनलोड करून घेण्यासाठी कंबर कसली असून, दररोज चौकाचौकांत, प्रभागात थांबून कॉलेज, संस्था येथे या ‘स्वच्छता अ‍ॅप’ची माहिती देणे व ते डाऊनलोडसाठी सूचना देत आहेत.स्वच्छतेबाबत नागरिकांच्या तक्रारी सहजरीत्या नोंदविता याव्यात, यासाठी डिजिटल माध्यम म्हणून ‘स्वच्छता अ‍ॅप’ची निर्मिती केली आहे.२४ तासांत होणार निराकरणपरिसरातील कचरा, तुंबलेली गटारे, भरलेल्या कचरा कुंड्या, अस्वच्छ परिसर, अशुद्ध पाणी, सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था यांचे फोटो काढून ते 'स्वच्छता अ‍ॅप'वर टाकल्यास त्यांची दखल घेऊन महापालिका प्रशासन १२ ते २४ तासांत त्यावर उपाययोजना करून पुन्हा त्याचे उत्तर अ‍ॅपवर दिले जात आहे.कोल्हापूर महापालिका देशात १९२ क्रमांकावरनागरिकांनी हे ‘स्वच्छता अ‍ॅप’ डाऊन लोड करून त्यावर परिसरातील तक्रारी द्याव्यात, असे आवाहन करण्यात येत आहे.महाविद्यालय, हॉस्पिटल, संस्था, हॉटेल येथे अधिकारी, कर्मचारी या अ‍ॅपविषयी माहिती देत, शहर स्वच्छतेमध्ये सहभागी होण्याविषयी जनजागृती करीत असल्याचे मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील यांनी सांगितले.शहरातून एकूण २ हजार ३९० तक्रारी अ‍ॅपवर दाखल.नोव्हेंबर महिन्यात ३२ तक्रारी दाखल असून त्यातील २८ तक्रारींचे निराकारण झाले असून ४ कामांची पूर्तता सुरु आहे.स्वच्छतेविषयक कामगिरीचा दर्जा, कौन्सिल आॅफ इंडिया संस्थेद्वारे सर्वेक्षण होते. यावर्षी स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अंतर्गत देशातील ४ हजार ४१ शहरे सहभागी आहेत. स्वच्छता गुणवत्तेविषयक विविध निकष सहभागी शहरांना पार पाडायचे आहेत.